चित्रदुर्ग हे भारताच्या कर्नाटक राज्याच्या चित्रदुर्ग जिल्ह्याचे मुख्यालय आहे. चित्रदुर्ग शहर कर्नाटकच्या मध्य भागात राष्ट्रीय महामार्ग ४वर बंगळूरपासून २०० किमी अंतरावर स्थित आहे. अहमदनगरपासून जवळपास ७०० कि मी वर आहे. फिरायला जवळपास १-२ तास लागतात ह्याच नाव चित्र दुर्ग आहे कारण दुर्ग म्हणजे किल्ल्यात जायचा मार्ग हा चित्राने कोरलेला आहे. बाहेरून बघणाऱ्याला वाटेल कि जणू हे एक चित्र आहे पण तो आत मध्ये जाण्याचा मार्ग आहे , इ. स. ११०० ते इ. स. १३०० या कालावधीत चालुक्य काळात या किल्ल्याचे बांधकाम झाले होते. १५०० एकर क्षेत्रावर विस्तारलेला हा किल्ला भारतातील मोठ्या किल्ल्यांपैकी एक समजला जातो. अजस्र ग्रॅनाइटच्या शिळा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य. [सादर विडिओ दुसऱ्या चॅनेल वरून घेतलेला आहे ] Inform...