Skip to main content

Posts

मनोगत

 प्रवास करणे आणि वेग वेगळ्या ठिकाणांना जाऊन भेट देणं हा माझा छंद  आहे. आत्तापार्येंत महाराष्ट्र आणि भारतामधल्या बऱ्याच ठिकाणी फिरणं झालं. ते स्मरणात राहावं आणि वाचणाऱ्याला माहिती व्हावी म्हणून हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली . ज्यांना इंग्रजी भाषेत वाचायचं आहे त्यांना पण ब्लॉगर ने सोय दिली आहे भाषांतर करण्याची. हे सर्व फोटो मी स्वतःच्या कॅमेरा आणि मोबाइलला मध्ये टिपलेले आहेत . माहिती आवडली आणि ह्यातून तुह्माला काही नवीन मिळालं तर दुसर्यांनाही सांगा. चला तर मग करू सुरुवात . Image by Freepik
Recent posts

Westin Hotel Koregaon Park Pune

Amazon Post Peak Party  2016  

अंबाबाई महालक्ष्मी मंदिर, कोल्हापूर

पुराणात उल्लेखलेल्या १०८ पीठांपैकी एक, व महाराष्ट्रात असलेल्या देवीची साडेतीन पीठांपैकी एक आहे. हे मंदिर इ.स.६३४ साली चालुक्य राजा कर्णदेव याने बांधले आहे. मंदिराचे पहिले बांधकाम चालुक्य राजघराण्याच्या काळात झाले. दर्शन घेण्यास साधारण ३-४ तास पुरेसे आहेत. गर्दी किती आहे त्यावर वेळ कमी जास्त होते.

गुरुद्वारा शिकार घाट साहिब, नांदेड

  गुरुद्वारा शिकार घाट साहिब, नदीच्या काठापासून ३०० मीटर अंतरावर उंच टेकडीवर बांधलेल्या आर्किटेक्चरचा एक सुंदर नमुना आहे.  दर्शन घेण्यास साधारण अर्धा तास पुरेसा आहे 

स्वामी नारायण मंदिर, पुणे

  पुण्यातील मुंबई-बगळु महामागावर आंबेगाव बुुक येथे २७ एकरमध्ये आहे. इथे फिरण्यासाठी २ तास वेळ पुरेसा आहे.

चतुर्शृंगी मंदिर, पुणे

  नाशिकनजवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी. पेशवाईतील प्रसिद्ध सावकार दुलभशेठ या देवीचा मोठा भक्त होता व तो वणीला दर्शनास नेहेमी जात असे. कालांतराने त्याचे वय झाल्यावर देवीने त्याच्यासाठी तत्कालीन पुण्यानजीक प्रकट होत असल्याचा दृष्टांत त्यास दिला. परंतु वेळेआधीच दुलभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यास आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दुलभशेठने मंदिर बांधले. दुलभशेठने चतरशिंगी रुपयाही पडला होता. दर्शन घेऊन फिरण्यास साधारण २ तास पुरेसे आहेत                                          माझ्या वडिलांचे एक मित्र आहेत. ते पुणे विद्यापीठात संगणक क्षेत्रात नोकरी ला होते.  त्याच्या नोकरीच्या ४० वर्षात दररोज चालत जाऊन  त्यांनी चतुःशृंगी देवी...

सारसबाग, पुणे

 तळ्यातला गणपती असलेले सारसबाग हे उद्यान पुण्यातील एक महत्त्वाचे पर्यटन आकर्षण आहे. पर्वतीच्या पायथ्याशी असलेल्या या बागेतील गणपती पेशव्यांचे पूजास्थान होता. श्रीमंत नानासाहेब पेशवे यांच्या कारकिर्दीत पर्वतीच्या पायथ्याशी सन १७५० साली आंबील ओढयाच्या सीमेवर एक कृत्रिम तलाव तयार करण्याचे काम सुरू झाले. तलावाचे काम सन १७५० ते १७५३ या कालावधीपर्यंत चालले होते. त्या तलावाचे क्षेत्र अंदाजे २५ एकर एवढे विस्तीर्ण होते. या तलावाचा उपयोग नौकाविहारासाठी करण्यात येत होता. तलावात सारस पक्षी सोडले होते. तलावाच्या कामाची खोदाई करीत असताना तलावामध्ये अंदाजे २५००० चौरस फुटाचे बेट तयार करून ते मंदिर व बाग-बगीचा तयार करण्याकरिता राखून ठेवण्यात आले. त्या नंतर बेटावर सुंदर बाग तयार करण्यात येऊन श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी या बागेला काव्यात्मक ' सारस बाग ' असे नाव ठेवले. श्रीमंत सवाई माधवराव पेशवे यांनी सन १७८४ साली तलावाच्या बेटावर छोटेसे मंदिर बांधून तेथे आराध्य दैवत श्री सिद्धिविनायक गजाननाची स्थापना केली. साहजिकच पर्वती, सारस बाग आणि तलाव ही पुणेकरांची फिरावयास येण्याची व देवदर्शनाची ठिकाणे...

Amazon Prime Membership