Skip to main content

गोंदेश्‍वर मंदिर, सिन्नर, नाशिक

टाहाकारीवरून ठाणगाव-दुबेरे-सिन्नर असा अंदाजे ३० किलोमीटरचा सुस्थितीत असलेला रस्ता आहे. सिन्नर हे पुणे-नाशिक महामार्गावरचे महत्त्वाचे औद्योगिक केंद्र असल्याने पुण्याहून नारायणगाव मार्गे राष्ट्रीय महामार्गाने येथे पोचता येते. मुंबईकरांना येण्यास मुंबई-ठाणे-घोटी-सिन्नर असा मार्ग आहे. सिन्नर शहरातील तहसील कार्यालय आणि पोलिस स्टेशनच्या समोरच हे संरक्षित मंदिर आहे. 


एका प्रशस्त आवारात हे मंदिर बांधलेले असून, सभोवती पुरुषभर उंचीची तटबंदी आहे. हे गोंदेश्‍वराचे मंदिर शिवपंचायतन असून, एका प्रशस्त चौथऱ्याच्या मध्यभागी मुख्य सप्तस्तरीय (म्हणजे सात थरांमध्ये असलेली रचना) मंदिर आहे व त्यात शिवलिंग आहे. भूमीज शैलीत बांधलेल्या या मंदिरासमोर नंदी मंडप आहे. मुख्य मंदिराच्या बाजूंना विष्णू, गणेश, पार्वती व सूर्य या देवतांची उपमंदिरे आहेत. मुख्य मंदिर गर्भगृह व सभामंडप या दोन दालनांत विभागले असून, त्याला तीन द्वार आहेत. ते गोविंदराज या यादव राजाने बाराव्या शतकात बांधले. या मंदिराचीही रचना भूमीज शैलीतच आहे. म्हणजेच मुख्य शिखराच्याच आकाराची लहान लहान शिखरे एकावर एक अशी रचना करत मंदिराचे शिखर बनवले जाते. मुख्य शिखर आणि त्याचे घटक असलेली उपशिखरे यातील साम्य अतिशय लक्षवेधक असते. या रचनेलाच शिखर-शिखरी रचना असेही म्हणतात. सभामंडपातील खांब नक्षीने शिल्पालंकृत असून, त्यांवर डोळ्यांचे पारणे फेडणारी अनेक शिल्पे कोरण्यात आली आहेत. मंदिरांच्या भिंतींवर अनेक देवता, अप्सरा, पौराणिक प्रसंग कोरले आहेत.  




आम्ही सकाळी ८ च्या दरम्यानच्या नाशिक येथून कार ने निघालो आणि बरोबर ११-१२ च्या दरम्यान ह्या मंदिरात पोहोचलो. 











Information Source: https://www.esakal.com/tourism-news/pankaj-zarekar-article-about-gondeshwar-mandir-sinnar-nashik-312680

Comments

Amazon Prime Membership