Skip to main content

चतुर्शृंगी मंदिर, पुणे

 

नाशिकनजवळच्या वणीचे म्हणजेच सप्तश्रुंगीदेवीचे पुण्यातील स्थान म्हणजे चतु:श्रुंगी. सप्तश्रुंगनिवासिनी ही साडेतीन शक्तीपीठांपैकी एक व अनेकांची कुलस्वामिनी. पेशवाईतील प्रसिद्ध सावकार दुलभशेठ या देवीचा मोठा भक्त होता व तो वणीला दर्शनास नेहेमी जात असे. कालांतराने त्याचे वय झाल्यावर देवीने त्याच्यासाठी तत्कालीन पुण्यानजीक प्रकट होत असल्याचा दृष्टांत त्यास दिला. परंतु वेळेआधीच दुलभशेठ देवीने सांगितलेल्या ठिकाणी पोहोचला तेंव्हा देवी पूर्ण प्रकट झालेली नसून तीन हात व चेहेराच प्रकट झाल्याचे त्यास आढळून आले. हे स्थान म्हणजेच चतु:श्रुंगी होय. अर्थातच या स्थानी दुलभशेठने मंदिर बांधले. दुलभशेठने चतरशिंगी रुपयाही पडला होता.

दर्शन घेऊन फिरण्यास साधारण २ तास पुरेसे आहेत 


                                माझ्या वडिलांचे एक मित्र आहेत. ते पुणे विद्यापीठात संगणक क्षेत्रात नोकरी ला होते.  त्याच्या नोकरीच्या ४० वर्षात दररोज चालत जाऊन  त्यांनी चतुःशृंगी देवीचं दर्शन घेतलं. 







Comments

Amazon Prime Membership